महाराष्ट्र

मोठी बातमी: साताऱ्यात डॉक्टर तरुणीनं हातावर लिहिलेलं नाव अखेर सापडलं; पुण्यातून संशयित अटकेत

सातारा, 25 ऑक्टोबर 2025: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणात मोठी प्रगती झाली आहे. डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी हातावर दोन तरुणांची नावे लिहीत गंभीर आरोप केले होते. या प्रकरणातील एक प्रमुख संशयित प्रशांत बनकर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रशांत बनकर पुण्यात मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसला होता. बनकरच्या अटकेनंतर या घटनेतील अनेक महत्वाच्या तथ्यांवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

डॉक्टर तरुणी फलटणमधील विद्यानगरमध्ये पेईंग गेस्ट म्हणून वास्तव्यास होती. तिने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे की, प्रशांत बनकरने तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. बनकर आणि डॉक्टर तरुणी यांचा नेमका संबंध काय होता, याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत.

या अटकेमुळे आता डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येपूर्वी काय घडले, याबाबत तपशील समोर येण्याची अपेक्षा आहे. साताऱ्यातील या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली असून, समाजात मानसिक आरोग्य आणि महिलांवरील त्रास यावर चर्चेला गती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button